नाशिक पोलिसांच्या निर्लज्ज आणि थिल्लरपणाचे जिवंत पुरावे

Story By: Mandaar Deshpande, Pics By: Veeru Kadam

नाशिकची वाहतुक व्यवस्था आणि वाहतुक पोलिस नेहमी या ना त्या निमित्ताने आजपर्यंत चर्चेत आले आहेत. वाहतुक पोलिस नाकाबंदीच्या निमित्ताने वसुली करतात हे सर्वश्रुत आहे. या प्रकरणी अनेकवेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेकवेळा सापळा रचुन लाचखोर वाहतुक पोलिसांना गजाआडही केले आहे. पण मुळ मुद्द्याला नेहमीच हरताळ फासली गेलीये. वाहतुक विभागाच्या वरिष्ठांकडे या चिरीमिरीबाबत तक्रार केली असता, त्यांनी नेहमी पुराव्यांची मागणी केली आहे. आता हेच पुरावे आम्ही आपणासमोर ठेवत आहोत. हे पुरावे फक्त लाचखोरीचेच नाही तर वाहतुक पोलिस कर्मचार्‍यांच्या थिल्लरपणाचेही आहेत. आता सांगा कधी आणि काय कारवाई करता यांच्यावर. निर्लज्जपणाची हद्द पार केलेल्या या पोलिसांच्या लाचखोरीचे आणि निर्लज्जपणचे हे जिवंत पुरावे !

ठिकाण आहे, गरवारे पॉइंट, अंबड, नाशिक.

LikeDislike

हा घ्या , अजुन एक पुरावा… वाहतुकीला शिस्त लावायचं तर सोडाच, पण यांचा संपुर्ण वेळ अशा पद्धतीने
वसुली करण्यातच जातो !

LikeDislike

पुढील छायाचित्र हे गरवारे पॉइंट्वरुन जाणार्‍या ट्रकचे आहे. गरवारे पॉइंट हा “क्रिम” पॉइंट समजला जातो. मुंबई महामार्गावरील ह्या पॉइंटवरुन दररोज हजारो ट्रक आणि इतर वाहने मुंबईहून नाशिक आणि नाशिकहून मुंबई ये- जा करत असतात.. त्याप्रमाणे या पोलिसांच्या वसुलीची आकडेमोड केल्यास किती “वरकमाई” केली जाते याचा अंदाज येईल.

LikeDislike

आणि आता बघुयात याच टिममधील इतर कर्मचारी काय थिल्लरपणा करत होते. ह्या फोटोमधील युवक एका युवतीसोबत बाइकवर जात असतांना, त्याला पकडण्यात आलं. आणि युवतीला बाइकवर सोबत घेउन जाण्याची शिक्षा म्हणुन की काय, या युवकाशी अशा प्रकारे थिल्लरपणा करण्यात आला. हा थिल्लरपणा चालु असतांना या युवकाला वाटणारी लाज त्याच्या चेहर्‍यावर दिसत होती. आम्ही हा फोटो टाकताना या युवकाचा चेहरा काही प्रमाणात झाकला आहे, कारण त्याच्या अब्रुचे जे धिंडवडे या पोलिसांनी भर रस्त्यात काढले त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून होऊ नये म्हणून. ह्या प्रकारची लाज या युवकाला वाटली, आम्हालाही वाटली पण या पोलिसांना मात्र किंचीतही वाटली नाही. हा निर्लज्जपणा म्हणावा की खाकीचा माज ?

आणि जर हा निर्लज्जपणा किंवा माज नसेल, तर पोलिस भर चौकात या युवकाचे फोटो का बरं काढत असावेत असा प्रश्न उपस्थित होतो. आणि जर हा युवक या पोलिसांचा मित्र असेल, तर याबाबतचा खुलासा याच पोलिस कर्मचार्‍यांनी सदर युवकाच्या खर्‍याखुर्‍या ओळखीसह नक्की सादर करावा.. अन्यथा आपण निर्लज्ज आणि माजोरडे आहोत हे मान्य करावे !

LikeDislike

नाशिकमध्ये वाहतुकीला शिस्त लावायची सोडून धरपकड करणे आणि माया लाटणे हेच जर वाहतूक पोलिसांचे काम असेल, तर जनप्रक्षोभाचा दिवस दूर नाही. आम्ही पुरावे देण्याचं काम केलं आहे, आता वेळ वाहतुक पोलिस अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची आहे.

आपल्याही आजुबाजुला भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार होत असतील तर आपण त्याचे फोटो किंवा व्हिडीओ आमच्याकडे nashikcalling@gmail.com

वर पाठवू शकता.

We the undersigned ask you to sign our petition. We Request To Higher Authorities To Take Action Against These Guys.

Name:

E-mail address:

Do not display name on website:

govind t jain,

xxxxxxxx,

prashant kadam,

ajinkya tarte,

Manish,

Kaivalya Sohani,

nashik news, nashik political news, breaking news, exclusive news, nasik, nashik

 

Posted in Nashik Police | Tagged , , , , , , | 18 Comments